वॉकीटॉकीच्या ऑनलाईन विक्रीवर निर्बंध

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वॉकीटॉकीसह अन्य रेडिओ उपकरणांच्या विक्रीसंदर्भात व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वॉकीटॉकीसह अन्य रेडिओ उपकरणांची बेकायदेशीर यादी आणि विक्री रोखण्यासाठी सीसीपीएने हे पाऊल उचलले. योग्य फ्रिक्वेन्सी रेंज, लायजनिंगची माहिती आणि उपकरण टाईपच्या मंजुरीशिवाय होणाऱ्या वॉकीटॉकीच्या विक्रीचा तपास रोखणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळून आले, असे सीसीपीएने म्हटले आहे.