निवृत्त बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी मूक निदर्शने

370

प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी निवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी बोरिवली पश्चिमेकडे हातात फलक घेऊन मूक निदर्शने केली. या निदर्शनास बोरिवली व आसपासच्या परिसरातील जवळपास 200 निवृत्त बँक कर्मचारी उपस्थित होते. याचबरोबर सह्यांची देखील मोहीम यावेळी राबविण्यात आली.

फॅमिली पेन्शनमध्ये सरकारी नियमांप्रमाणे वाढ करा, ज्येष्ठ नागरिकांना 10 लाखांपर्यंतचे विमा कवच द्या, जेष्ठ ठेवीदारांच्या ठेवींवर किमान 9 टक्के व्याज द्या, ज्येष्ठांच्या विमा हप्त्यांवर आकारला जाणारा जीएसटी रद्द करा, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे निदर्शन करण्यात आले होते. याआधी डोंबिवली, घाटकोपर, ठाणे व अंधेरी येथे देखील मूक निदर्शनं करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या