स्तोत्रांचा भावार्थ

107

>>

या पुस्तकात विविध देवतांवरील निवडक स्तोत्रं आहेत. सर्व स्तोत्र अतिशय सोप्या शब्दांत भावार्थासहित लेखिका रंजना उन्हाळे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितले आहेत. देवतेविषयीची माहिती, स्तोत्राबद्दलची माहिती व स्तोत्राचा सोप्या भाषेतील भावार्थ या पुस्तकाला अधिक वाचनीय बनवतो. या पुस्तकाचे प्रकाशन सृजनरंग प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

बहुतांश स्तोत्र ही संस्कृत भाषेत आहेत. सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा शतप्रतिशत शास्त्राrय, वैज्ञानिक भाषा आहे असे भाषा पंडितांचे मत आहे. ‘स्तोत्र सुमनांजली’ या शीर्षकाने संस्कृत वाङ्मयाचे संकलन आणि प्रकाशन सात्यताने लेखिकेने केले आहे. आमवाचकांना स्तोत्रांचा परिचय करून देण्याचा हा उपक्रम लेखिकेने सुरू ठेवला आहे. हा स्तुत्य उपक्रम पुस्तकरूपाने सहा भागांत प्रसिद्ध झाला असून हा या पुस्तकाचा सातवा भाग आहे.

आपण अनेकदा स्तोत्र पठण करतो. परंतु प्रत्येकालाच या स्तोत्रांचा अर्थ माहिती असतो असे नाही. या पुस्तकात लेखिकेने नेमक्या शब्दांत स्तोत्रांसंबंधी परिचय देण्याचा जो ढाचा स्वीकारला आहे तो अत्यंत स्वागतर्ह आहे. हे पुस्तक वाचकांना तसेच स्तोत्रपाठकांना उपयोगी ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या