
हिंदुस्थान-पाकिस्तानातील तणाव युद्धविरामामुळे निवळण्याची शक्यता निर्माण झाल्याने पुढे ढकलण्यात आलेल्या सीए परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा 16 ते 24 मेदरम्यान घेण्यात येतील, अशी घोषणा इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) आज रात्री केली. या परीक्षा 9 ते 14 मेदरम्यान होणार होत्या; परंतु युद्धजन्य स्थितीमुळे आयसीएआयने सुरुवातीला परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. आता सीए अंतिम, इंटरमीडिएट आणि आयएनटीटी-एटी (पीक्यूसी) परीक्षा 16 ते 24 मेदरम्यान घेण्यात येतील.