पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्या बरोबरीने महिलांनी स्वतःच्या हिमतीवर अब्जावधींचे साम्राज्य उभे केले आहे. अशा टॉप 10 महिलांकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. जगातील या टॉप 10 महिलांमध्ये अमेरिकेचा दबदबा आहे. टॉप 10 मधील 10 पैकी सहा महिला या अमेरिकेतील आहेत. या महिलांकडे व्यावसायिक निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्त्व करण्याची कुवत, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, कंपन्यांचे व्यवस्थापन हाताळण्याचे कौशल्य, नवनवीन आयडिया, व्यवसाय वाढवण्याची ताकद, कुटुंब जबाबदारी यासह अनेक पॉवरफुल गट आहेत. जगातील टॉप 10 महिलांमध्ये हिंदुस्थानच्या जेएसडब्ल्यू ग्रुपच्या मालकीन सावित्री जिंदाल यांच्या नावाचाही समावेश आहे. पहिल्या स्थानावर लोरियल कंपनीच्या फ्रँकोइस बेटेनकोट आहे. जगातील टॉप 10 गर्भश्रीमंत महिलांविषयी जाणून घेऊयात…
नाव नेटवर्थ वय कंपनी देश
फ्रेंकोइस बेटेनकोट 99.5 बिलियन डॉलर 70 लोरियल फ्रान्स
एलिस वॉल्टन 72.3 बिलियन डॉलर 74 वॉलमार्ट अमेरिका
ज्युलिया कोच 64.3 बिलियन डॉलर 61 कोच इंडस्ट्रीयल अमेरिका
जॅकलिन मार्स 38.5 बिलियन डॉलर 84 कॅन्डी, पेट फूड अमेरिका
मॅकेंजी स्कॉट 35.6 बिलियन डॉलर 53 ऍमेझॉन अमेरिका
सावित्री जिंदाल 33.5 बिलियन डॉलर 74 स्टील हिंदुस्थान
राफाएला डायमंट 33.1 बिलियन डॉलर 79 शिपिंग स्वित्झर्लंड
मिरीएम एडेल्सन 32 बिलियन डॉलर 78 कॅसिनोस अमेरिका
जीना रिनाहर्ट 30.8 बिलियन डॉलर 70 मायनिंग ऑस्ट्रेलिया
एबीगेल जॉन्सन 29 बिलियन डॉलर 62 फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट अमेरिका