शेवटची ट्रिप मारून येतो ! तुटलेली काच मानेत घुसून रिक्षाचालक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मित्रांनो शेवटची ट्रिप मारून येतो.. असे अन्य रिक्षाचालकांना सांगून गेलेला विकास पुन्हा आलाच नाही. ही दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. प्रवाशाला सोडून घरी परतत असलेल्या विकास गाडे याच्या रिक्षाचा 90 फीट रोडवर भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला मागून जोरात धडक दिल्याने रिक्षाच्या फुटलेल्या काचा मानेत घुसल्याने रक्तस्त्राव होऊन विकासचा मृत्यू झाला.

विकास उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरामधील साईबाबानगर येथे राहत होता. गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास उल्हासनगर स्टेशन येथून ठाकुर्लीचे भाडे घेतले होते. शेवटची ट्रिप मारून येतो असे त्याने अन्य रिक्षाचालक मित्रांना सांगितले होते. विकास प्रवाशाला ठाकुर्लीला सोडून परतत असताना त्याच्या रिक्षात त्याचा मित्र शैलेशही मागे बसला होता. ९० फीट रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका खासगी बसला त्याच्या रिक्षाची मागून जोरात धडक बसली. त्यावेळी रिक्षाच्या समोरील काचा फुटून विकासच्या मानेत शिरल्या.