Video – पाहा रिंकू राजगुरूचा हा भन्नाट ‘मेकअप’

2218
archi-actress-rinku-rajguru

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सैराट व कागर या चित्रपटातून तिच्या जबरदस्त अभिनयाची झलक आपल्याला दाखवली आहे. या दोन्ही चित्रपटात गावाकडच्या मुलीची भूमिका साकारणारी रिंकू तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’ मध्ये थोड्या हटके भूमिकेत दिसणार आहे.

या टिझरमध्ये रिंकू दोन रुपात पाहायला मिळाली आहे. एकात ती घरातल्यांसमोर संस्कारी, लाजरी बुजरी असल्याचे दाखवत असते तर तेच मित्र मैत्रिणींसमोर, बाहेरच्या जगासमोर अगदीच बिनधास्त वावरताना दाखवलीय. यात ती दारू पिऊन धिंगाना करताना देखील दाखवली आहे. याआधी देखील या चित्रपटाचा एक टीझर रिलीज झाला होता. त्यात देखील रिंकू एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दारूच्या नशेत बिअरची बाटली हातात घेऊन बडबड करताना दिसत आहे.

मेकअप या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत चिन्मय उद्गगीरकर हा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक फ्रेश जोडी मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट गणेश पंडित यांनी दिग्दर्शित केला आहे. नव्या वर्षात 7 फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

rinku-makeup-teaser

आपली प्रतिक्रिया द्या