हर्षा भोगलेच्या प्रश्नावर ऋषभ पंत संतापला, म्हणाला..मी 32 वर्षांचा होईल तेव्हा

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा फलंदाज ऋषभ पंत त्याच्या बोलण्यामुळे चर्चेत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील फ्लॉप शो दरम्यान अलीकडेच, क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्याशी झालेल्या संवादात तो वीरेंद्र सेहवागशी संबंधित प्रश्नावर संतापलेला दिसला. यावेळी या ‘तुलनेत तर्क नाही’, असेही त्याने स्पष्ट केले.

भोगले म्हणाले, ‘मी काही वर्षांपूर्वी वीरूला एक प्रश्न विचारला होता, आता मी तुलाही तो प्रश्न विचारतोय, तुझा पांढऱ्या चेंडूचा खेळ खास असेल असे मला वाटले होते पण तुझा कसोटी रेकॉर्ड सर्वोत्तम आहे.’ याशिवाय न्यूझीलंडमधील पाऊस आणि बॅटिंग ऑर्डरवरही या दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये चर्चा झाली. यावेळी पंत म्हणला की, मला टी-20 मध्ये सलामीला खेळायला आवडेल.

भोगलेच्या मुद्द्यावर पंत म्हणाला की, ‘माझ्या मते माझा रेकॉर्ड हा एक नंबर आहे. माझा पांढऱ्या चेंडूचा रेकॉर्डही वाईट नाही, ठीक आहे. त्यावर भोगले म्हणाले, ‘मी वाईट म्हणत नाही, तुलना म्हणतोय.’

यावेळी रिषभ संतापून म्हणाला की, ‘सर, तुलना करणे हा तुमच्या आयुष्याचा भाग नाही. मी आता 24-25 वर्षांचा आहे, तुम्हांला तुलना करायची असेल तर मी 30-32 वर्षांचा होईल तेव्हा करा. त्याआधी तुलना करणे योग्य नाही.

.