अहमदपूरमध्ये कार पुलाला धडकली; अपघातात दोन ठार, तीन जखमी

751

अहमदपूर- अंबाजोगाई हायवेवर काजळ हिप्परगानजीक किनगावकडे जात असताना कारची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक बसली. कारमधील दोनजण जागीच ठार झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची शुक्रवारी पहाटे 4.30 ते 5 वाजण्याच्या सुमारास घडली. राजकुमार मारुती डिगोळे (वय 50), सिकंदर गौस शेख (वय 26) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. राजकुमार निवृत्ती देवदे (वय 42), माधव भागवत देवदे (वय 22), उत्तम बालाजी देवदे (वय 22) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. मृत आणि जखमी किनगाव तालुका अहमदपूर येथील रहिवासी असून हैदराबादच्या करमुळी येथे देवदर्शनासाठी गेले होते. गावाकडे परतत असताना तहा अपघात झाला.

आपली प्रतिक्रिया द्या