लखनऊ एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, ट्रकला धडक देऊन व्हॅनला आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

290

उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि व्हॅन यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर उन्नाव टोल प्लाझाजवळ ट्रक आणि व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेनंतर व्हॅनला आग लागली. या आगीत सात जणांचा जळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टायर फुटल्याने मारूती व्हॅनवरील नियंत्रण सुटले आणि ती विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. ट्रकला धडकल्यानंतर व्हॅनला आग लागली. यात व्हॅनमध्ये प्रवास करणाऱ्या सात जणांचा जागीच जळून मृत्यू झाला. या घटनेनंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या महिन्यात 10 जानेवारीला उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर बस आणि ट्रकला आग लागली होती. या आगीत दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या होत्या. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला होता तर 21 जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर अपघाताची ही दुसरी घटना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या