26 वर्षांनंतर दरोडेखोर गजाआड

मालाड येथे 1996 साली चड्डी बनियान गँगने दरोडा टाकला होता. त्या गुह्यात शंकर काळे ऊर्फ नानाला अटक झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर तो गेली 26 न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहत नव्हता. अखेर त्याला दिंडोशी पोलिसांनी शोधून काढून न्यायालयात हजर केले होते. मालाड पूर्व येथे एक सोसायटी आहे. 1996 मध्ये या गँगने एका घरात दरोडा टाकला होता. घटनेदरम्यान या टोळीच्या एकाने पोलिसांवर दगडफेक आणि धारदार शस्त्रांनी वार केले होते. त्या हल्ल्यात घर मालक आणि पोलीस जखमी झाला होता. पोलिसांनी हल्लेखोरांवर गोळीबार केला. त्यात या टोळीतील एकाचा मृत्यू झाला होता, तर चौघे हे पळून गेले होते. पोलिसांनी तपास करून संभाजीनगर येथून तिघांना अटक करून मुद्देमाल जप्त केला होता. त्या गुह्यात शंकर काळे हा सहा महिने तुरुंगात होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर तो न्यायालयात सुनावणीसाठी आलाच नव्हता.

वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या पथकातील उपनिरीक्षक संदीप वत्रे आणि पथकाने तपास सुरू केला. काळे हा सांताक्रूझ परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सप्टेंबरमध्येदेखील सांताक्रूझ येथे सापळा रचला, मात्र तो मिळून आला नाही. त्याला ओळखणे कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी काही माहिती गोळा केली. त्याचा आधारकार्ड आणि पत्ता घेतला. त्या पह्टोचा अभ्यास केला. नुकताच काळे हा सांताक्रूझ येथे किराणा दुकानात खरेदीसाठी आला होता तेव्हा पोलिसांनी काwशल्याचा वापर करून काळेला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने माहिती देण्यास नकार दिला. नंतर त्याने तो गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले.