पाहा व्हिडीओ: विठ्ठल मंदिरात रखुमाईचे दागिने लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील सध्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. संग्रामपूरमधील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला आहे. मात्र या चोरांच्या मंदिरातील लीला येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याला तात्काळ अटक केली. रुख्मिणीच्या मूर्तीच्या अंगावरील सोन्याचे २ डोरले आणि १ मणी चोरट्यांनी दर्शन घेण्याच्या बहाण्याने लंपास केले होते.

ज्यावेळी मंदिरातील पुजारी पूजा करायला मंदिरात गेला, त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यांतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पाठवले. दरम्यान पोलिसांनी अकोल्यामधील आरोपी अशोक हरणकार आणि वाशीम जिल्ह्यातील अरुण अंभोरे या दोघांना पकडले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.