पाहा व्हिडीओ: धुळ्यात सिनेस्टाईल गोळीबार करत दरोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । धुळे

धुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र काही थांबत नाही. जिल्ह्यात गुंडगिरी, खून, बलात्कारांसारख्या घटना राजरोसपणे घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गुरुवारी मालेगाव रोडवर एखाद्या सिनेमातल्या प्रसंगाप्रमाणे गोळीबार करत दुधाची डेअरी लुटल्याची घटना घडली आहे. मात्र लुटीच्या वाटणीवरून झालेल्या वादात दोन दरोडेखोर जखमी झाले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास येथील मालेगाव रोडवरील न्यू प्रतीक दूध डेअरीवर धाडसी दरोडा टाकला गेला. बाईकवर आलेल्या तीन दरोडेखोरांनी गोळीबार करत १५ हजार रुपयांची लूट करून फरार झाले. एखाद्या चित्रपटातल्या थरारक प्रसंगाप्रमाणे टाकलेल्या या दरोड्याचा थरार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला आणि या दरोडेखोरांना मनमाड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. लुटलेल्या रकमेच्या वाटणीवरून एकमेकांवर गोळीबार केल्याने दोन दरोडेखोर जखमी झाले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.