कोकणचा प्रवास होणार वेगवान, रोहा ते रत्नागिरी वीजेवरील इंजिन धावले; विद्युतीकरणाला वेग

कोकणचा प्रवास वेगवान होण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. त्यामुळे लवकरच कोकणचा प्रवास हायटेक आणि प्रदुषणमुक्त होणार आहे. रोहा ते रत्नागिरी या दरम्यानच्या 203 किलोमीटर रेल्वेमार्गावर गुरूवारी वीजेच्या इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. रोहा ते करंजाडी आणि दिवाण खवटी ते रात्नागिरी या रेल्वे मार्गावर ही इंजिन चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे लवकरच आता या मार्गावर डिझेल ऐवजी वीजेवरील इंजिनाच्या सहाय्याने मेल-एक्सप्रेस धावणे शक्य होणार आहे.

कोकण रेल्वेमार्ग हा रोहा पासून सुरू होत आहे. आतापर्यत या मार्गावर डिझेल इंजिनच्या रेल्वेगाडया धावत होत्या. रेल्वे प्रशासनाने या मार्गाचे विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाचे काम सुरू केले आहे. एल अॅण्ड टी पंपनीने रोहा ते रत्नागिरी या 203 कि.मी.च्या मार्गावरील विद्युतीतकरणाचे काम पूर्ण केले आहे. या मार्गावर 25 हजार किलोवॅट पॉवर सप्लायचे कामे पूर्ण झाले. 23 फेब्रुवारीपासून या वीज प्रवाहाची तपासणी करण्यात आल्यानंतर गुरूवारी पहिल्यांदाच वीजेवर धावणारे इंजिन या मार्गावर चालवून रोहा ते रत्नागिरी अशी चाचणी घेण्यात आली. दर नव्वद किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रीकचे सब स्टेशन उभारण्यात आले आहे.

प्रवाशांना मिळणार हे फायदे

कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून आतापर्यंत डिझेल इंधनावरतीच प्रवास सुरू आहे. कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे कोकणच्या प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि प्रदुषणमुक्त होणार आहे. त्यामुळे गाडयांच्या संख्येतही वाढ होणार असून भविष्यात लोकल चालविणेही शक्य होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या