देशातल्या निर्वासित रोहिंग्यांची कोरोना चाचणी करण्याचे केंद्राचे आदेश

783

देशातील निर्वासित मुस्लिम रोहिंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोहिंग्या मुस्लिम हे तबलिगी जमातच्या सदस्यांच्या संपर्कात आल्याचा केंद्र सरकारला संशय आहे. त्यामुळे रोहिंग्या व तबलिकी जमातमधील संबंधांचा तपास करण्याबरोबरच रोहिंग्या मुस्लिमांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्य सरकार व केंद्र शासित प्रदेशांना पत्राव्दारे दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सर्व पातळ्यांवर खबरदारी घेत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांचे पोलिस प्रमुख व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. तबलिगी जमातच्या इज्तिमा व इतर काही धार्मिक कार्यक्रमात रोहिंग्या मुस्लिमांनी भाग घेतल्याची माहिती केंद्र सरकारला मिळाली आहे. त्यामुळे रोहिंग्या मुस्लिमांनाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे.

30 हजार तबलिगींचा शोध
दिल्लीतल्या निजामुद्दिन भागात मागील महिन्यात तबलिगी जमातचा एक धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक तबलिगींना कोरोनाची लागण झाली. पुढे हे तबलिगी इतर राज्यात गेले तेव्हा त्यांच्या मार्फत अनेक राज्यांत कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने आतापर्यंत तबलिगी जमातशी संबंधित तीस हजार लोकांचा शोध घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या