वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा सुरू करण्यासाठी सध्या राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्याबाबतच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. जर हा निर्णय लागू झाला तर राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जवळपास 15 हजारांच्या आसपास शाळा बंद होणार आहेत. त्यावरून सध्या शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सरकारकडे शाळांसाठीच पैसे नाहीयेत का? शिक्षण हे सरकारचे काम राहीले नाही का? शिक्षणाचे खाजगीकरण करून सरकारला शिक्षणाचा बाजार करायचा आहे का? हेच प्रश्न शासनाच्या दत्तक शाळा व समुह शाळांच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना पडायला लागले आहेत. आमदारांच्या सुरक्षेवर, जाहीरातींवर, मोठ-मोठ्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 25, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी देखील यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ”सरकारकडे शाळांसाठीच पैसे नाहीयेत का? शिक्षण हे सरकारचे काम राहीले नाही का? शिक्षणाचे खाजगीकरण करून सरकारला शिक्षणाचा बाजार करायचा आहे का? हेच प्रश्न शासनाच्या दत्तक शाळा व समुह शाळांच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना पडायला लागले आहेत. आमदारांच्या सुरक्षेवर, जाहीरातींवर, मोठ-मोठ्या समारंभांवर करोडो रूपये खर्च करताना सरकारला पैशांची कमी जाणवत नाही का?” असा सवाल रोहीत पवार यांनी राज्य सरकारला केला आहे.