
सामना ऑनलाईन, मुंबई
‘टीम इंडिया’चा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न झाले. रोहितची पत्नी रितिकाने रविवारी गोंडस अशा मुलीला जन्म दिला आहे. मुलीला बघण्यासाठी रोहित शर्मा मायदेशी परतल्याने तो गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यास मुकणार आहे.




























































