अबुधाबीत हिटमॅनचा धमाका! कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम

मुंबई इंडियन्सने बुधवारी मध्यरात्री कोलकाता नाईट रायडर्स संघावर दणदणीत विजय संपादन करीत आयपीएलमध्ये गुणांचे खाते उघडले. `हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्णधार रोहित शर्माने अवघ्या 54 चेंडूंत 80 धावांची धडाकेबाज खेळी साकारत मुंबई इंडियन्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ही खेळी करताना त्याने क्रिकेटच्या रणांगणात पराक्रमांची नोंद केली. कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा, आयपीएलमध्ये 200 षटकार मारणारा आणि आता या स्पर्धेत पाच हजार धावांपासून फक्त दहा धावा दूर असणारा अशी ओळख त्याने निर्माण केलीय. यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ‘सामनावीर’ ठरलेले

 • खिस गेल – 21
 • ए. बी. डिाqव्हलियर्स – 20
 • रोहित शर्मा – 18
 • महेंद्रिंसग धोनी व डेव्हिड वॉर्नर – 17

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे

 • खिस गेल – 326
 • ए. बी. डिव्हिलियर्स – 214
 • महेंद्रिंसग धोनी – 212
 • रोहित शर्मा – 200

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे

 • विराट कोहली – 5426
 • सुरेश रैना – 5368
 • रोहित शर्मा – 4990
 • डेव्हिड वॉर्नर – 4712

कोणत्याही एका संघांविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे

 • रोहित शर्मा – 904 धावा (कोलकाता नाईट रायडर्स)
 • डेव्हिड वॉर्नर – 829 धावा (कोलकाता नाईट रायडर्स)
 • विराट कोहली – 825 धावा (दिल्ली वॅâपिटल्स)
 • डेव्हिड वॉर्नर – 819 धावा (किंग्ज इलेव्हन पंजाब)
आपली प्रतिक्रिया द्या