भन्नाट! 75 नंबरी बूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकमेकांपासून शारीरिक अंतर राखावं लागत आहे. यासाठीच रोमालियातील चप्पल तयार करणाऱया व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढवली आहे. त्याने असे बूट तयार केलेत, जे दोन व्यक्तींमध्ये दोन मीटरपर्यंत अंतर राखू शकतात. चक्क 75 क्रमांकाचा हा भलामोठा बूट आहे. त्याची किंमत अंदाजे 13 हजार 450 रुपये आहे.

बूट तयार करणाऱया ग्रिगोर लूप यांचे म्हणणे आहे की, युरोपियन साईजनुसार या बुटाचा नंबर 75 आहे. लोकांना एकमेकांपासून अंतर राखण्यास त्याची निश्चित मदत होईल. सध्या रोमालियात या बुटांची खूप चर्चा आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत जगभरात या बुटांची विक्री झाली आहे.

बेल्जियमचा डान्स ग्रुप, अमेरिकेचा रॉक बँड यांच्यासह अन्य मोठय़ा ग्रुपकडून लांबलचक बुटांसाठी ऑर्डर येत आहेत. सामान्य बुटांच्या तुलनेत हे लांबलचक आहेत. त्यामध्ये फरलाईनचा वापर केलाय आणि त्याचे सोल मोठे आहेत. ग्रिगोर गेल्या 40 वर्षांपासून चप्पल तयार करतात. रोमालियात सध्या कोरोनाच्या दुसऱया लाटेची शक्यता लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात आले आहे. आतापर्यंत रोमालियात चार लाख 92 हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत तर 11 हजार 876 जणांचा मृत्यू झाला आहे.