सर आली धावून, 264 कोटींचा पूल गेला वाहून; बिहार मधला धक्कादायक प्रकार

बिहारमधील गोपाल गंज व पूर्व चंपारणला जोडण्यासाठी 264 कोटी रुपये खर्चून भलामोठा पूल बांधण्यात आला होता. या पूलाचे 29 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. मात्र हा पूल पहिल्याच पावसाळ्यात चक्क वाहून गेला आहे. या पूलाचा एक भाग मुसळधार पावसाने कोसळला असून त्यामुळे या पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली आङे. त्यामुळे चंपारण, सारण अशा जिल्ह्यांचा संपर्क देखील तुटला आहे.

एप्रिल 2012 मध्ये या पूलाच्या कामाला सुरुवात झाली होती. बिहार राज्य पूल निर्माण निगमने या पूलाची निर्मिती केली आहे. तब्बल आठ वर्षांनी 1.4 किमीचा हा सत्तरगढ महासेतू पूल बांधून तयार झाला. 16 जूनला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पुलाचे उद्घाटन केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या पूलाखालून जाणाऱ्या गंडक नदीच्या पाण्यात वाढ झाली होती. दरम्यान बुधवारी रात्री या पूलाचा एक मोठा भाग कोसळला.

या दुर्घटनेनंतर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘तब्बल 264 कोटी खर्चून तयार केलेल्या ‘सत्तरघाट पूलाचे 16 जून रोजी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. आज 29 दिवसानंतर तो पूल कोसळला. या पूलात मोठा सरकारने भ्रष्टाचार केला आहे.’, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या