हिंदू समाजाचा अर्थ भाजप नाही, राजकीय लढाई हिंदूंशी जोडू नका – भय्याजी जोशी

1160

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरचिटणीस भय्याजी जोशी यांनी ‘हिंदू समाज म्हणजे भारतीय जनता पक्ष नाही, असे म्हटले आहे.  तसेच भाजपचा विरोध करणे म्हणजे हिंदूंचा विरोध करणे नसल्याचेही ते म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ‘राजकीय लढाई सुरुच राहणार असून या लढाईला हिंदूंशी जोडू नका.’ गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘विश्वगुरु भारत, आरएसएसचे दृष्टीकोन’ या विषयावर बोलत होते.

भय्याजी जोशी म्हणाले की, ‘हिंदुस्थानात काम करू इच्छिणाऱ्यांनी हिंदूंसोबत त्यांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. प्राचीन काळापासून हिंदुस्थानाचा उदय व पतन हिंदूंनी पाहिला आहे. त्यामुळे हिंदुस्थानाला हिंदू समाजाशी वेगेळे करून पाहता येणार नाही. हिंदू नेहमीच या देशाच्या केंद्रस्थानी राहिला आहे.’ असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या