अटकेच्या भीतीपोटी हेडगेवारांनी बोस यांची भेट नाकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरसंघचालक हेडगेवार नाशिकमुक्कामी असताना त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती. ब्रिटिशांच्या भीतीने ही भेट नाकारली होती, असा खळबळजक आरोप ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या वक्तव्यावरून नवा राजकीय वादंग उभा राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यवतमाळमधील वणीमध्ये काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच तसेच माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. नितीन राऊत यांनी हे वक्तव्य केले होते.

नेमके काय म्हणाले…

सरसंघचालक हेडगेवार हे नाशिकमध्ये मुक्कामी होते. त्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या खासगी सचिवाला निरोप देऊन नाशिकला त्यांच्या भेटीला पाठवले. त्या खासगी सचिवाने हेडगेवारांच्या माणसाला भेटायचे असल्याचे सांगितले. खासगी सचिव दारात उभे असताना हेडगेवारांनी ती भेट नाकारली होती. त्या वेळी आपण आजारी आहोत, भेटायचे नाही असे कारण देण्यात आले होते. आपण जर त्यांना भेटलो तर कदाचित जेलमध्ये टाकतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. जी त्या खासगी सचिवांनी ऐकली होती, असे राऊत या वेळी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातींमध्ये तंटे निर्माण केले तेच आपल्याला आज शहाणपण शिकवत आहेत, असेदेखील नितीन राऊत म्हणाले.