Rupali Chakankar Resignation – भोंदूबाबाच्या नादी लागणं भोवलं, रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी वादात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोग अध्यक्षापदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अजित पवार गटाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला.

रुपाली चाकणकर यांनी केवळ महिला आयोग अध्यक्षपदाचाच नाही, तर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये या पदासाठी आता नव्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.