
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत देशाचे चलन आणखी कमकुवत झाले आहे. रुपयाची घसरण कायम असून, गुरुवारी नवीन नीचांक गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी 14 पैशांनी घसरला. एक डॉलरसाठी 87.57 रुपये मोजण्याची वेळ आली. गेल्या दोन महिन्यांपासून रुपयाची घसरण सुरू आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून यात भर पडली.