कोरोना लसनिर्मितीत रशियाची बाजी, सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा

959

कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलेल्या जगाला दिलासा देणारी बातमी रशियन संशोधकांनी दिली आहे. आपल्या संशोधकांनी कोरोनाला रोखणारी प्रभावीो लास तयार केली असून तिच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा रशियाच्या सेचेनोव्ह विश्वविद्यालयाने केला आहे. हा दावा खरा ठरल्यास कोरोनाच्या दहशतीखाली ठप्प झालेल्या जगाला मोठा दिलासाच लाभणार आहे. अमेरिकन संशोधकांनीही त्यांची कोरोनावरील लास लवकरच रुग्णांच्या सेवेला येईल अशी घोषणा केली आहे. मात्र रशियाने सर्वप्रथम जगाला हायसे वाटणारा संदेश देत कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठी बाजी मारल्याचे संकेत त्यांच्या दाव्यातून मिळत आहेत.

रशियाच्या इंस्टीटय़ूट फॉर ट्रांसलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नोलॉजीचे निदेशक वदिम तरासोक यांनी सांगितले की, सेचेनोव्ह विश्वविद्यालयाने 18 जून लाच रशियातील गेमली इंस्टीटय़ूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड माइक्रोबायोलॉजी द्वारा निर्मित लसीच्या चाचण्या सुरु केल्या होत्या. जगातील पहिल्या कोरोनाप्रतिबंधक लसीचे मानवी स्वयंसेवकांवर चाचण्या यशस्वी आणि उत्साहवर्धक झाल्याचे तारासोक म्हणाले.

लवकरच बाजारात उपलब्ध होणार लस
सेचनोक युनिव्हर्सिटीच्या इंस्टीटय़ूट ऑफ मेडिकल पैरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिसीजचे निदेशक अलेक्जेंडर लुवाशेक यांच्या म्हणण्यानुसार ,कोरोनावरील नव्या लसीच्या सर्व मानवी चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. शिवाय लसीच्या सुरक्षिततेबाबतही आम्ही पूर्ण पडताळणी केली आहे.लवकरच आम्ही मानवासाठी संजीवनी ठरेल अशी कोरोनाप्रतिबंधक लस बाजारात विक्रीला आणू असा विश्वासही लुकाशेव्ह यांनी व्यक्त केला.

औषध निर्मिती आणि वैद्यकीय उत्पादनात सेचेनोव्ह नामांकित
रशियाचे सेचेनोव्ह विश्वविद्यालय हे उच्च शिक्षणासोबतच वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या मॉडर्न औषध निर्मितीतही अग्रेसर आहे. कोरोनावरील त्यांची लस निश्चितच मानवासाठी वरदान ठरेल,असा विश्वासही तारासो व्ह यांनी बोलून दाखवला.या लसीच्या चाचण्या ज्यांच्यावर झाल्या त्या स्वयंसेवकांना आम्ही 20 जुलैला त्यांच्या घरी परतण्याची परवानगी देऊ असेही तारासोव्ह यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीची mRNA-1273 ही कोरोना लसही मानवी चाचणीच्या तिसऱया टप्प्यात असून ती लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होईल असे अमेरिकन संशोधकांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या