
रशियाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि उपसंरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयव्ह यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्लादिमीर अलेक्सेयव्ह यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराने हा गोळीबार मॉस्कोतील एका अपार्टमेंटमध्ये केला. रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियन लष्करी अधिकाऱयांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यानंतर थेट रशियाच्या उपसंरक्षणमंत्र्यांवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामागे युक्रेनचा हात असावा, असा संशय रशियाने व्यक्त केला आहे. रशिया आणि युव्रेन यांच्यातील युद्ध हे थांबायचे नाव घेत नाही. हे युद्धा आता एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे.


























































