
रशिया व युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. युक्रेनने आज पहिल्यांदाच रशियाच्या पाणबुडीला लक्ष्य केले आहे. बंदरात उभ्या असलेल्या पाणबुडीवर युक्रेनने पाण्याखालून ड्रोनहल्ला केला.
युक्रेनची गुप्तचर संस्था एसबीयूने ही माहिती दिली असून हल्ल्याचा व्हिडीओदेखील प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, ‘ब्लॅक सी’मधील बंदरात उभ्या असलेल्या रशियाच्या प्रोजेक्ट 636.3 या पाणबुडीवर हल्ला करण्यात आला. या पाणबुडीवर चार क्रूझ मिसाइल तैनात करण्यात आली होती. या हल्ल्यात रशियाची पाणबुडी आणि त्यावरील क्षेपणास्त्रs उद्ध्वस्त झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.































































