युक्रेन शांतता आराखडय़ावर सही करण्यास हिंदुस्थानचा नकार

गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन दरम्यान रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांचा एकमेकांशी असणाऱया संबंधांमध्ये बदल झालेला दिसला. युद्धात कोण कुणाच्या बाजूने आहे यावर बराच खल झाला. आता हे युद्ध थांबावे आणि वेगवेगळय़ा देशांमधील आपसातील संबंध सुधारावेत यासाठी स्वित्झर्लंडमध्ये जगभरातील प्रमुख देशांची परिषद आयोजित करण्यता आली होती. यावेळी सकारात्मक चर्चाही झाली. मात्र, 80 देशांनी सहमती दर्शवलेल्या शांतता आरखडय़ावर हिंदुस्थानने सही करण्यास नकार दिला आहे.