टिकटॉकला रशियन कोर्टाचा जोरदार झटका

हिंदुस्थानसह अन्य काही देशांत बंदी असलेल्या टिकटॉकला रशियातील एका न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 65 लाखांचा दंड ठोठावला आहे. रशियन कायद्याचे पालन न केल्याने न्यायालयाने टिकटॉकला 60 लाख रूबल म्हणजेच जवळपास 65 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मॉस्कोच्या टॅगांस्की जिह्याच्या न्यायदंडाधिकाऱयाने टिकटॉक प्रायव्हेट लिमिटेडला रशियातील कलम 13.49 च्या 2 अंतर्गत दोषी ठरवले. 28 जुलै रोजी रशिया मीडिया नियामक संस्था रोसकोम्नाइजोरच्या आदेशाचे पालन न केल्याने टिकटॉकवर 50,200 डॉलर्सचा दंड ठोठावला होता, तर डिसेंबर 2024 मध्ये मॉस्कोच्या टॅगांस्की जिल्हा न्यायालयाने प्रतिबंधित कंटेट न हटवल्याप्रकरणी टिकटॉकला 28,600 डॉलरचा दंड ठोठावला होता.