
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सोमवारपासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱयावर गेले आहेत. त्यांचा हा दौरा 4 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या दौऱयात ते अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रूबियो यांच्या बैठकीत सहभागी होतील, अशी माहिती हिंदुस्थानच्या विदेश मंत्रालयाने दिली आहे. या बैठकीत क्रिटिकल मिनरल्स मजबूत करणे, स्वच्छ ऊर्जेच्या दिशेचा बदल आणि रणनीतीक सहकार्य यांसारख्या मुद्दय़ांवर चर्चा केली जाणार आहे. खनिज इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी, संरक्षण आणि नवीन टेक्नोलॉजीसाठी हे सर्व आवश्यक आहे. या वेळी ते अमेरिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांना भेटणार आहेत.

























































