हिंदुस्थानला चीनसोबत जावेच लागेल, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे स्पष्टीकरण

1961

हिंदुस्थान आणि चीन या दोन देशांतील संबंधातील संतुलन महत्त्वाचे आहे. कारण शेजारील राष्ट्रांत एकमेकांमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर एकमत होणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंदुस्थानला चीनसोबत जावेच लागेल, असे स्पष्टीकरण केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी दिल्लीतील ‘रायसिना डॉयलॉग’मध्ये बोलताना केले. अमेरिका आणि इराण हे जगातील दोन विशिष्ट देश आहेत. या दोघांपैकी कोणत्या देशाच्या बाजूने जगातील कोणता देश जातो यावर हा संघर्ष किती टिकणार हे अवलंबून आहे, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

आशिया पॅसिफिक विभागात हिंदुस्थानला कायम शांतता अपेक्षित आहे. आमचा विश्वास विध्वंसक कारवायांवर नाही, तर चांगले निर्णय घेण्यावर आहे, असेही ते म्हणाले. एक काळ होता जेव्हा हिंदुस्थान कामाच्या तुलनेत बाता जास्त करत होता, पण आता स्थिती तशी राहिलेली नाही. आमचा विश्वास स्वतःचा बचाव करण्याकडे नाही, तर योग्य, चांगला निर्णय घेण्यावर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या