सामना अग्रलेख – सलाम!

3714

संपर्क तुटलेल्याविक्रमचे छायाचित्र ऑर्बिटरने आता पाठविल्याने थांबलेले कार्य पुन्हा सुरू होऊ शकते. देशाच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली आहे. कार्य संपलेले नाही आणि पुढच्या अनेक मोहिमांवर काम करायचे आहे. के. सिवान यांच्या डोळ्यांत शेवटी अश्रू तरळले. ‘विक्रम लॅण्डरचंद्राच्या पृष्ठभूमीवर ठरल्याप्रमाणे उतरू शकले नाही, पण चंद्राच्या कक्षेत ते गेले. चंद्राला गवसणी घातली. हा प्रयोग सफल झाला. विज्ञानाला झटका बसला असेल, पण चंद्रावर तिरंगा फडकवण्यासाठीची हिंदुस्थानी वैज्ञानिकांची जिद्द कायम आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम.

तू चाँद हैं, तू तेरे नखरे तो दिखाएगा,

येभारततेरा आशिक है, लौटकर आएगा!

प्रत्येक देशवासीयांच्या आज फक्त याच भावना आहेत. चंद्रावर तिरंगा फडकवण्यासाठी पुन्हा तयारीनिशी येणे हीच जिद्द आहे. शुक्रवारी रात्री संपूर्ण देश जागा होता (पण पाकिस्तानसारख्या दुश्मनांची झोप उडाली होती) चंद्रावर हिंदुस्थानचे पाऊल पडणार तो क्षण अनुभवण्यासाठी प्रत्येक हिंदुस्थानी वृत्तवाहिन्यांसमोर बसला होता, पण चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटरवर असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अवघा एक मिनिट बाकी असताना हिंदुस्थानच्याचांद्रयान-2’ मोहिमेतील विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटला तो क्षण अनुभवण्यास उत्तेजित झालेल्या कोट्यवधी जनतेची जणू हृदयाची धडधड थांबली. पंतप्रधान मोदी हेसुद्धा त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बंगळुरूला पोहोचले होते. वैज्ञानिकांचे अभिनंदन करण्यासाठी ते गेले, पण विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटल्याने निराश झालेल्या वैज्ञानिकांना धीर देण्याची वेळ मोदींवर आली. इस्रोचे अध्यक्ष डॉ. सिवान यांच्या भावनांचा बांध फुटला त्यांचा डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. पंतप्रधानांनी डॉ. सिवान यांना जवळ घेऊन त्यांना धीर दिला हे दृश्य प्रत्येक हिंदुस्थानीला भावनाविवश करणारे आहे. पंतप्रधान म्हणाले, ‘‘हिंमत ठेवा, निराश होऊ नका. जीवनात चढउतार येतच असतात. तुमचे चेहरे पडलेले दिसत आहेत, पण तुम्ही केलेले काम मोठे आहे.’’ वैज्ञानिकांनी अपार मेहनत घेऊनविक्रम लॅण्डरचा प्रयोग यशस्वी केला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.

वैज्ञानिकांचे दुःख

डॉ. सिवान यांचे अश्रू समजण्यासारखे आहेत. याआधी इस्रोच्या अनेक मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. तशानासाच्याही अनेक मोहिमा जमिनीवर आपटल्या आहेत. रशियाने अंतराळात स्पुटनिक सोडून आघाडी मारली तेव्हा या क्षेत्रातील स्वतःची पीछेहाट दूर करण्यास अमेरिकेने नेटाने आरंभ करून अनेक योजना हाती घेतल्या आणि एकामागून एक अपोलो याने चंद्राच्या दिशेने झेप घेऊ लागली. त्यांनाही अनेकदा अपयशाचे धक्के बसले. शुक्रवारी आपल्याविक्रम लॅण्डरचा संपर्क तुटला (सध्या माणसांचा माणसांशीही संपर्क तुटत चालला आहे) एक वाजून 53 मिनिटांनी विक्रम लॅण्डर चंद्रावर उतरणार होते, पण चंद्राचा पृष्ठभाग समोर दिसत असताना सारा देश श्वास रोखून जागा असताना चांद्रयानाचा संपर्क तुटला. जुलै महिन्यात 22 तारखेलाचांद्रयान-2’ जमिनीवरून उडाले. 48 दिवस अंतराळात प्रवास करून पृथ्वीपासून तीन लाख 84 हजार किलोमीटर दूर चांद्रभूमीवरविक्रमउतरणार होते. आजवर कोणताही देश पोहोचलेल्या चंद्राच्या दक्षिण धुवाजवळच्या भागात हिंदुस्थानी तिरंगा फडकणार होता. हे स्वप्न आज अधुरे राहिले असले तरी भविष्यात ते पूर्ण होईल. ‘विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटला, पण आपले ऑर्बिटर या क्षणी चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे. याच ऑर्बिटरने आता (रविवारी) लॅण्डर विक्रमचीथर्मलछायाचित्रे पाठवली आहेत. ऑर्बिटरमध्ये बसवलेल्या ऑप्टिकल हाय रिझोल्यूशन थर्मल कॅमेऱ्यानेविक्रमची छायाचित्रे पाठवली आहेत. ‘विक्रमशी अद्याप संपर्क प्रस्थापित झालेला नसला तरी तोसापडलाहे महत्त्वाचेच आहे. मावळलेल्या

आशा पल्लवित करणारी

ही घडामोड आहे. पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत सोप्या शब्दांत या मोहिमेचे मर्म सांगितले, ‘‘विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग.’’ चंद्रापर्यंत पोहोचण्याचे आतापर्यंतचे सगळे अवघड टप्पे अत्यंत कुशलतेने पार पाडण्यात इस्रोच्या वैज्ञानिकांना यश आले. इथे एक समजून घेतले पाहिजे की, ‘विक्रमहा एका मोठ्या मालवाहू वाहनासारखा आहे. ज्याला वैज्ञानिक किंवा तांत्रिक भाषेतलॅण्डरम्हटले जाते. हा लॅण्डर अलगदपणे चंद्रावर उतरतो. याविक्रममध्येप्रग्याननावाचे एक छोटे वाहन आहे. ‘विक्रमचंद्रावर उतरल्यानंतर त्याचे दरवाजे उघडून त्यातूनप्रग्यानबाहेर पडले असते. हारोव्हरम्हणजेचप्रग्यानचंद्राच्या पृष्ठभागावर उतरून महत्त्वाची माहिती, नमुने इस्रोच्या अंतराळ संशोधन केंद्राकडे पाठवणार होते. तूर्तास ते थांबले असले संपर्क तुटलेल्याविक्रमचे छायाचित्र ऑर्बिटरने आता पाठविल्याने हे थांबलेले कार्य पुन्हा सुरू होऊ शकते. देशाच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली आहे. कार्य संपलेले नाही आणि पुढच्या अनेक मोहिमांवर काम करायचे आहे. के. सिवान यांच्या डोळ्यांत शेवटी अश्रू तरळले. के. सिवान यांनी त्यांच्या टीमच्या मदतीने ही मोहीम राबवली. ‘विक्रम लॅण्डरचंद्राच्या पृष्ठभूमीवर ठरल्याप्रमाणे उतरू शकले नाही, पण चंद्राच्या कक्षेत ते गेले. चंद्राला गवसणी घातली. हा प्रयोग सफल झाला. विज्ञानाला झटका बसला असेल, पण चंद्रावर तिरंगा फडकवण्यासाठीची हिंदुस्थानी वैज्ञानिकांची जिद्द कायम आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम.

आपली प्रतिक्रिया द्या