सामना प्रभाव! महामार्गावरील धोकादायक खड्डे भरण्यास सुरुवात

संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.66 ला लागून असणारा आंबेड बुद्रुक गावाजवळ मोठ मोठे खड्डे पडले होते. त्या खड्ड्यात रोज अपघात होत होते. अनेक गाड्याचे टायर फुटत होते. त्याच्या विरोधात नवनिर्मिती फाउंडेशनच्या रमजान गोलदाज यांनी आवाज उठवला होता.

संबंधित विभागाच्या आणि कंपनीच्या कारभराबाबत ताशेरे ओढत रस्त्याचे खड्डे तात्काळ भरले नाहीत तर, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी यांच्या कार्यालयात येऊन खड्डे पाडेन असा इशारा दिला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आंबेड येथील मोठ मोठे खड्डे भरले असून त्याबबद्दल प्रशासनाचे आणि संबंधित कंपनीचे आभार मानले आहेत. याबाबत सामनाने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधले होते.

मात्र सध्या मोठे मोठे खड्डे भरले. मात्र उर्वरित खड्डे कधी भरणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. सबधित प्रशासन लवकरात लवकर उर्वरित खड्डे भरतील अशी अपेक्षा रमजान गोलंदाज यांनी व्यक्त केली असून खड्डे भरले नाहीत, तर संघर्ष अटळ आहे असे स्पष्ट केले आहे. नवनिर्मितीने आंदोलनाचा दिलेल्या इशाऱ्याचे वृत्त दैनिक सामनाने सचित्र प्रसिद्ध करून राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणावर ताशेरे ओढले होते. याची दखल घेऊन आज तातडीने खड्डे भरले गेल्याने वाहनचालकांनी सामनालाही धन्यवाद दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या