
“बीडीडी चाळींचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रॅट पद्धतीने लॉटरी झाली. मात्र या सिस्टिममध्ये असा कोणता रॅट घुसला की, पूर्ण पद्धतच बदली करून टाकली”, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सचिन अहिर यांनी सरकारला विचारला आहे. आज विधान परिषदेत बोलताना त्यांनी हा प्रश्न उपकंठीत केला आहे.
सचिन अहिर म्हणाले आहेत की, “बीडीडी चाळीच्या फेज 1 च्या लोकांना फेज 2 मध्ये टाकलं आहे. काहींना फेज 3 आणि 4 मध्ये जावं लागेल. चौथ्या पाचव्याला दुसऱ्या तिसऱ्या फेजमध्ये आणण्याचं काम झालं आहे. राजकीय हस्तक्षेप होत असेल तर सामाजिक संतुलन बिघडून चांगल्या प्रकल्पाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. उच्च स्तरावर बैठक घेऊन यातील गौरसमज पुढे होणार नाही, याची दक्षता घेऊन कायमस्वरूपी हा लॉटरीच्या पद्धतीत स्पष्टता आणणार आहात का?” असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला आहे.





























































