सचिनची 2003 मधील खेळी सर्वोत्तम – इंझमाम

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक नेत्रदीपक आणि धडाकेबाज खेळी केल्यात. मात्र पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हक याला सचिन तेंडुलकरची 2003 सालामध्ये झालेल्या वर्ल्ड कपची खेळी आवडते. रवीचंद्रन अश्विन याच्या यू टय़ूबवरील डीआरएस विथ अॅश या शोमध्ये त्याने आपले मत व्यक्त केले.

इंझमाम उल हक यावेळी म्हणाला, पाकिस्तानी संघात त्यावेळी वासीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर हे अव्वल वेगवान गोलंदाज होते. सेंच्युरियन येथील खेळपट्टीही वेगवान गोलंदाजांना पोषक होती. अशा परिस्थितीत सचिन तेंडुलकरने लाजवाब खेळी साकारत टीम इंडियाला जिंकून दिले, अशा शब्दांत इंझमाम उल हक याने सचिन तेंडुलकरच्या खेळीचे कौतुक केले.

आपली प्रतिक्रिया द्या