सचिन तेंडुलकर मुंबईत रस्ता चुकला

सचिन तेंडुलकर पक्का मुंबईकर, पण तो सुद्धा जानेवारी 2020 मध्ये मुंबईत रस्ता चुकला होता. त्याचा व्हिडीओ त्याने आता शेअर केला आहे. कांदिवली पूर्व भागात सचिन रस्ता विसरला आणि मग मंगेश फडतरे नावाच्या रिक्षाचालकाने त्याला ‘मार्गा’वर आणले. माझ्या रिक्षाला फॉलो करा असं रिक्षाचालक म्हणाला. त्यानंतर सचिनची अलिशान गाडी रिक्षाच्या मागून त्याला फॉलो करत हायवेपर्यंत येऊन पोहचली. या ठिकाणी सचिनने रस्त्याच्या बाजूला गाडी लावत रिक्षाचालकाला सेल्फीदेखील दिला. हायवेवर पोहचल्यानंतर सचिनला त्याचा मार्ग सापडला आणि तो वांद्रय़ाच्या दिशेने रवाना झाला.

आपली प्रतिक्रिया द्या