सचिनने जिंकला क्रीडा क्षेत्रातील ऑस्कर

323

मास्टर ब्लास्टर, विश्वविक्रमादित्य, क्रिकेटचा देवदूत अशा विविध उपाध्यांनी गौरविण्यात आलेला ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. ‘टीम इंडिया’ने 2011 साली मायदेशात श्रीलंकेचा पराभव करून जगज्जेतेपद पटकावले होते. यावेळी संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानावर फेरी मारली होती. या फोटोला गेल्या 20 वर्षांतील सर्वोत्कृष्ट क्रीडा क्षणाचा पुरस्कार मिळाला आहे. जर्मनीची राजधानी बर्लिन येथे सोमवारी रात्री क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱया सर्वोत्कृष्ट क्रीडा लॉरेन्स पुरस्काराने सचिनला गौरविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या