हिंदुस्थानी मुली सॅफमध्ये चॅम्पियन

276

हिंदुस्थानच्या युवा मुलींनी भुतानमध्ये झालेल्या जेतेपदाच्या लढतीत बांगलादेशवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 अशा फरकाने विजय मिळवत सॅफ 15 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यामधील लढतीच्या पूर्वार्धात हिंदुस्थानच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. पण त्यांना गोल काही करता आला नाही. उत्तरार्धात मात्र बांगलादेशच्या खेळाडूंनी मिडफिल्डमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुस्थानला गोलपासून वंचित राहावे लागले. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर निकाल लागण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. शूटआऊटमध्ये अदरीजा सारखील हिने बांगलादेशच्या खेळाडूची किक परतवून लावल्यामुळे हिंदुस्थानला जेतेपदावर मोहोर उमटवता आली.

अदिलच्या गोलमुळे नामुष्की टळली

एकीकडे हिंदुस्थानच्या मुलींनी शानदार कामगिरी करीत सॅफ स्पर्धा जिंकली असतानाच हिंदुस्थानच्या पुरुषांना निराशेला सामोरे जावे लागले. फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीत बांगलादेशने यजमान हिंदुस्थानला 1-1 अशा बरोबरीत रोखले. अदिल खानने 88व्या मिनिटाला गोल केल्यामुळे हिंदुस्थानवरची पराभवाची नामुष्की टळली.

आपली प्रतिक्रिया द्या