
शिवसेना शाखा क्रमांक 215 व ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (ताडदेवचा राजा) यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विभागातील तरुणांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता ‘साहेब चषक 2023’ या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विभागातील माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपविभाग प्रमुख सुजित राणे, उपविभाग संघटक लतिका पाष्टे, समन्वयक मानसी पुजारे, यशोदा कोटियन, सहसमन्वयक हरीश धारिया, शाखा संघटिका सुप्रिया शेडेकर, नयना देहेरकर, मंडळाचे अध्यक्ष अशोक सांडिम, संतोष सावंत, गणेश भोसले, सागर राणे, सचिन मेस्त्र्ााr, ज्येष्ठ शिवसैनिक श्रीराम पुजारी, सह्याद्री प्रतिष्ठानचे तुषार नार्वेकर, आदित्य यादव, अंकुर सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख सिद्धेश माणगावकर यांनी केले.
























































