मांजरेकरांच्या सईचा सही दबंग लूक

मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही ‘दबंग 3’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सईचा सिनेमातील लूक कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर या सस्पेन्सवरून पडदा हटला आहे. ‘दबंग’ अभिनेता सलमान खान यानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सिनेमातील सईचा लूक शेयर केला आहे. या फोटोतील सलमान आणि सईची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून त्यांच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंटस्चा पाऊस पडत आहे.


View this post on Instagram

On location #dabangg3 . . . @saieemmanjrekar

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

‘दबंग 3’ मधील सईचा लूक लीक होऊ नये यासाठी सलमानने सुरुवातीपासूनच काळजी घेतली होती. चित्रपटाच्या सेटवर सर्वांचे मोबाईल फोन जमा केले जात होते. अखेर सलमाननेच आज सोशल मीडियावरून सईचा लूक शेयर केला आहे. ‘दबंग 3’ चे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले असून सिनेमाची निर्मिती अरबाज खान यांची आहे. हा सिनेमा 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच ‘आयफा’च्या ग्रीन कार्पेटवरदेखील सलमान आणि सई एकत्र झळकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या