साईबाबा संस्थानला ऑक्सिजन प्लाण्टसाठी खंडपीठाची मान्यता

शिर्डी येथील साईबाबा संस्थानला आरटीपीसीआर लॅब स्थापन करण्यास, सध्याच्या कोरोना परिस्थितीत हॉस्पिटलला लागणारे डॉक्टर्स, नर्सेस आदी पदे तातडीने भरण्यास आणि युद्धपातळीवर ऑक्सिजन प्लाण्ट उभारण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाने मान्यता दिली आहे.

कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे व संदीप कुलकर्णी यांनी कोविड-19 च्या प्रादुर्भाव काळात वरील सर्व सुविधा शिर्डी संस्थानने उपलब्ध करून द्याव्यात यासाठी संस्थानकडे पाठपुरावा केला होता व त्यानंतर संजय काळे यांनी ऍड. सतीश तळेकर यांच्यामार्फत त्यांनी मूळ जनहित याचिकेत एक दिवाणी अर्ज दाखल करून वरील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी विनंती केली.

आज झालेल्या सुनावणीत शिर्डी संस्थानच्या वतीने असे स्पष्ट करण्यात आले की, याचिकेतील विनंतीप्रमाणे लॅब उभारण्याची संस्थानची तयारी असून संस्थानच्या काही तज्ञ डॉक्टर्सनी आरटीपीसीआर लॅबमधील कामाचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. त्यानुसार न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. डी. कुलकर्णी यांनी याचिकेतील विनंत्या मान्य केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या