धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर साक्षीचे ट्वीट, निवड समिती प्रमुखांचेही स्पष्टीकरण

1324

गुरुवारी कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. या संदर्भात आता धोनीची पत्नी साक्षी आणि निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या फक्त अफवा असल्याचे दोघांनीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुर्तास तरी धोनीच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी गुरुवारी टीम इंडियाचा संघ निवडण्यात आला. यावेळी बोलताना निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले की, धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा या अफवा आहे. याबाबत आम्हाला अद्याप त्याच्याकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच धोनीची पत्नी साक्षी हिने देखील ट्वीट करून ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

2005 ते 2014 दरम्यान खेळलेल्या 90 कसोटीत धोनीने 4876 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 6 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. 224 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर आतापर्यंत 350 एकदिवसीय लढतीत त्याने 10 शतक आणि 73 अर्धशतकांसह 10773 धावा चोपल्या आहेत. नाबाद 183 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर 98 टी-20 लढतीत 1617 धावांची नोंद धोनीच्या नावावर आहे. धोनीच्याच नेवृत्वाखाली टीम इंडियाने 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 ला एक दिवसीय विश्वचषक जिंकला होता. तर कसोटीमध्ये पहिले स्थानही पटकावले होते.

आपली प्रतिक्रिया द्या