नशेच्या गोळ्या विकणाऱ्या सलीम कालाला अटक

56
सामना प्रतिनिधी , संभाजीनगर

जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारच्या डॅशबोर्डमध्ये नशेच्या गोळ्यांचा साठा ठेवून तो विक्री करणाऱ्या सलीम काला यास गुन्हे शाखेच्या पथकाने कटकट गेट परिसरातून अटक केली. त्याच्या ताब्यातून १६० गोळ्यांचे स्ट्रिप्स, एक धारदार चाकू आणि इंडिका कार जप्त करीत जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सलीम काला यास न्यायाल्याने ६ तारखे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

जिन्सी पोलीस ठाण्याची हद्द गुन्हेगारांचे माहेरघर आहे. शहराच्या विविध भागांत नशेच्या गाळ्या विक्री करणारे अड्डेच या भागात सदैव तैनात असतात. विशेष म्हणजे जिन्सी पोलिसांना याची माहिती असूनसुद्धा त्या अड्ड्यांकडे विशेष दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरात नशेबाज धुमाकूळ घालत आहेत. नशेबाजांनी तीन तरुणांचा खून तर अनेक तरुणांवर प्राणघातक हल्ले केल्याच्या अनेक घटना उघड झालेल्या आहेत. मात्र, या अड्ड्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, हे विशेष.

नशेबाज आणि नशेच्या गोळ्या विक्रीवर लगाम लावण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुन्हे शाखेला आदेशित केले होते. मात्र, एटीसीप्रमुख योगेश धोंडे यांनी रांजणगावात धडक कारवाई करत नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त करत तीन धारदार शस्त्रे जप्त केली होती. या कारवाईमुळे खडबडून जागे झालेल्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमोल देशमुख यांनी औषधी निरीक्षक राजगोपाल बजाज यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली असता त्यांना कटकट गेट येथील शेख सलीम ऊर्फ काला शेख यासीन (३५) हा पाण्याच्या टाकीजवळ इंडिका कारमध्ये (एमएच २६ एस १५९०) नशेच्या गोळ्या विक्री करत असल्याची माहिती मिळाली. यावरून उपनिरीक्षक देशमुख यांच्या पथकाने सलीम काला यास ताब्यात घेतले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्नशेच्या गोळ्या विकणाऱ्या सलीम कालाला अटक याने कारच्या डॅशबोर्डमध्ये न्युट्रोसीन आणि स्पॉस्मो पॅरोक्सीन १६० गोळ्यांचे स्ट्रिप्स लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी गोळ्या जप्त करीत कारमधून एक धारदार चाकूही जप्त केला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या