काळवीट प्रकरणी सलमान खानला मोठा धक्का… वाचा सविस्तर

2590

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. या प्रकरणात सलमान खानची बाजू गेली अनेक वर्षे लढवणाऱ्या त्याच्या वकिलाचे गुरुवारी निधन झाले आहे. महेश बोरा असे त्याच्या वकिलाचे नाव असून ते गेल्या काही दिवसांपासून आजारील होते.

काळवीट शिकार प्रकरणातील काही महिन्यांपूर्वी झालेल्या सुनावणीपर्यंत त्यांनी सलमान खानची बाजू न्यायालयात मांडली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

1998 साली ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काकानी गावच्या परिसरात सलमानने दोन काळवीटांची शिकार केली होती. या शिकारीप्रकरणी सलमान खानच्या विरोधात हा खटला 20 वर्षे चालला होता. सलमान सोबतच सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांचाही या खटल्यात समावेश होता. पण गेल्या वर्षीच राजस्थान उच्च न्यायालयानेया चौघांना निर्दोष ठरवले होते. सलमानला काळवीट प्रकरणात वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या कलम 1972 अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या