सिनेकामगारांसाठी ‘राधे’ धावला!

कोरोनामुळे काही राज्यांमध्ये शूटिंग ठप्प झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या सिनेसृष्टीतील मेकअपमन, टेक्निशियन, स्पॉटबॉय आदी कामगारांची पंचाईत झाली आहे. अशा तब्बल 25 हजार कामगारांच्या मदतीसाठी बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खान सरसावला आहे. सर्वकाही सुरळीत होईपर्यंत दरमहा कामगारांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा करण्याची घोषणा त्याने केली आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईजने (एफडब्ल्यूआयसीई) ही माहिती दिली आहे. संस्थेचे अध्यक्ष बी. एन. तिवारी म्हणाले, गरजू कामगारांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी सलमानने आमची मदत घेतली आहे.

ज्या कामगारांना खरोखर पैशांची गरज आहे अशा कामगारांची आम्ही यादी तयार करत आहोत. त्यानंतर गरजूंपर्यंत ही मदत पोहोचवली जाईल. आगामी ‘राधे’ या चित्रपटातील कमाईचा एक हिस्सा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी देणार असल्याचे सलमानने यापूर्वीच जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या