अफवा पसरवणाऱ्यांना समांथाने खडसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी समांथा आणि नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटाच्या बातमीनंतर समांथाला ट्रोल केले जातेय. तिच्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अखेर समांथाने याप्रकरणी मौन सोडले असून ट्रोलर्सना तिने खडेबोल सुनावले आहे.

आपल्या इन्स्टा स्टोरीवर समांथाने म्हटलेय, माझे अफेअर चालू होते. मला मूल नको होते. मी संधीसाधू आहे आणि माझा गर्भपात झाला अशा अफवा काहीजण माझ्याबाबत पसरवत आहेत. मात्र घटस्पह्ट ही वेदनादायी प्रक्रिया असून यावर मात करण्यासाठी मला एकटे सोडा. माझ्यावर केले जाणारे वैयक्तिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. तुम्ही मला हवे ते बोला, पण तुम्ही मला तोडू शकणार नाही, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे. तसेच या कठीण काळात साथ देणाऱयांचेही तिने आभार मानले आहेत. 2 ऑक्टोबरला अधिपृत निवेदन जारी करत समांथा आणि नागा चैतन्यने घटस्पह्टाची घोषणा केली होती. तसेच नागा चैतन्यकडून समांथाला 200 कोटी रुपयांची पोटगी ऑफर दिली होती, मात्र समांथाने ही ऑफर नाकारल्याचे वृत्त आहे.