BJP ला धक्का ! शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत समरजीत घाटगे यांचं सूचक विधान

भाजप नेते समरजीत घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे कोल्हापुरात भाजपला धक्का बसला आहे. यंदा कागलमध्ये परिवर्तन होणार आणि आणखी काही लोकांचा पक्ष प्रवेश होणार असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

कागलच्या गैबी चौकात घाटगे यांचा जाहीर प्रवेश झाला. तेव्हा घाटगे म्हणाले की, माध्यमांचे लोक मला विचारतात की, कागलमध्ये समोर मंत्रीमहोदय आहेत. त्यांच्याकडे महायुती सरकार, केंद्र सरकार, मोठ्या संस्थेंची ताकद आहे, तुमच्याकडे काय आहे. तर माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची साथ आहे असे घाटगे म्हणाले, आता मला काही नकोय असेही घाटगे म्हणाले. पुढच्या दोन महिन्यात आपल्याला खुप काम करायचे आहे, घराघरांत शरद पवारांचा विचार आणि तुतारी पोहोचवायची आहे असेही घाटगे म्हणाले.