ऊसाचा रस डबाबंद करून वर्षभर विकता येणार, पुण्यातील तरुणाचे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधन

1905

शिरूर तालुक्यातील नागरगावचे अभियंता समीर कांतीलाल शेलार यांनी ऊसाचा रस डबाबंद व दीर्घ काळ टिकवून ठेवण्याचे संशोधन केले आहे. त्यांनी यासाठीचे पेटंटही मिळवले असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. शेलार यांनी केलेल्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा रस डबाबंद करून वर्षभर बाजारपेठेत विकता येईल. निसर्गाच्या लहरीपणामुळे ऊस उत्पादन शेतकऱ्यांसमोर बऱ्याच अडचणी असतात. काही वेळेला ऊसाला अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. यावर काहीतरी मार्ग निघाला पाहीजे या तळमळीतून शेलार यांनी या संशोधनाला सुरुवात केली होती. ऊस हे प्रमुख पीक असलेल्या शेतकऱ्यांना दोन पैसे जास्तीचे मिळावेत, त्यांचे नुकसान न होता त्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांनी ऊसाचा रस डबाबंद करून वर्षभर टीकवता येईल का हे तपासायला सुरुवात केली होती. यात त्यांना यश आल्याने फक्त राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं शेलार यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या