समुद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

600

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना निघण्यापूर्वी जी जमीन खरेदी झाली त्यात मोठा घोटाळा असून त्याची चौकशी करण्यात यावी तसेच लोकायुक्तांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. जमीन अधिग्रहणाची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्यात आली असून याबाबतच्या आरोपांत काहीही तथ्य आढळले नसल्याने चौकशी प्रकरण बंद करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या