सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड अर्ध्या तासात आऊट ऑफ स्टॉक

907

सॅमसंगच्या गॅलेक्सी फोल्ड फोनने पदार्पणातच बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्री-बुकिंगला सुरुवात होताच अवघ्या अर्ध्या तासात 1 हजार 600 फोनची विक्री होऊन हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. या फोल्डबल फोनची किंमत 1 लाख 64 हजार रुपये असून प्री-बुकिंग करण्यात आलेल्या ग्राहकांना 20 ऑक्टोबरला फोनची डिलीव्हरी मिळणार आहे. 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये हा फोन लॉंच झाला आहे. या फोनमध्ये एकूण सहा कॅमेरे देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या